क्रिकेट

Team India : टीम इंडियातून वगळल्यानंतर ‘हा’ क्रिकेटर गेला परदेशात! ‘या’ संघाशी केला करार

Cheteshwar Pujara : टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा 2024 च्या काऊंटी हंगामात ससेक्स संघासोबत खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर त्याने काउंटी संघासोबत सलग तिसऱ्या वर्षी करार केला आहे. 26 डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी संघातून बाहेर गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये […]

maharashtra News

मुस्लिम धर्मातही ज्योतिषशास्त्राचे पंडित! बिस्मिल्ला पिंजारी 30 वर्षांपासून पाहतात मुहूर्त अन् कुंडली

एकविसाव्या शतकातही हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कोणतेही कार्य असो, त्यासाठी मुहूर्त अथवा कुंडलीही पाहिलीच जाते. यासाठी अर्थातच आठवतात गावातील ब्राह्मण, गुरुजी. ज्योतिषशास्त्र हा ब्राह्मण वर्गाचा पारंपरिक अभ्यास असला तरी आज ज्योतिषशास्त्रात विविध धर्म व समाज पारंगत होत ज्योतिष पाहण्यासह विविध मुहूर्त व कुंडली पाहणे त्यांनी सुरू केले आहे.  दहिगाव (ता. यावल) येथील मुस्लिम धर्मातील […]

देश - विदेश

Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या सहाव्या आरोपीचीही ओळख पटली; जाणून घ्या कोण आहे ललित झा?

लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. मात्र, तो सध्या फरार आहे. या घटनेचा व्हिडिओ त्याने आपल्या सहकाऱ्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. मात्र, तो सध्या फरार आहे. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सहकाऱ्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. हल्ल्यानंतर आरोपी ललित झा याने […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 14 डिसेंबर 2023

मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल. कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वाहने जपून चालवावीत. सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कन्या : प्रॉपर्टीची […]

क्रिकेट

Team India Squad U19 WC 24 : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूकडे संघाची धूरा

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात ‘या’ 15 प्लेयर्सला मिळाली संधी Team India Squad announced for ICC Men U19 World Cup 2024 : आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2024 यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळला जाणार आहे. याआधी तो श्रीलंकेत होणार होता, परंतु आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला यजमानपद मिळाले. आता BCCI अंडर-19 वर्ल्ड कप 2024 […]

ताज्या बातम्या

Mumbai : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भजबळांना दिलासा

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही याचिका मागे घेण्यात आली आहे मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे ईडीने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. परंतु छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळाविरोधातील खटला मात्र ईडीने मागे घेतलेला नाही.दिल्लीतील महाराष्ट्र सदन […]

ताज्या बातम्या

Beed News : नाट्यगृहाचा ‘तमाशा’; बीडमध्ये कलावंतांचे आंदोलन

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरवस्‍था, खुर्च्या तुटल्‍या, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड बीड : जिल्ह्यातील सर्वांत पहिले व सर्वांत मोठे असा एकेकाळी लौकिक असलेल्या येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील खुर्च्यांची मोडतोड, वातानुकूलित यंत्रणेचा बिघाड, स्वच्छतागृहाची मोडतोड झाल्याने कलावंत, नाट्यप्रेमींची कुचंबणा होत असल्याचा आरोप नाट्यप्रेमींनी केला. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे प्रशासन जाणीवपूर्णक कानाडोळा करत असल्याचा आरोप करत नाट्यप्रेमींनी […]

maharashtra News

Mumbai : प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली सरकारची फक्त इव्हेंटबाजी ; काँग्रेसची टीका

याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. मुंबई : मुंबई प्रदुषणाच्या बाबतीत आज मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, सरकार प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली फक्त इव्हेंटबाजी करीत असल्याची टीका काँगेसने केली आहे. आयआयटीबी व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संस्थेच्या अहवालानुसार, ७१ टक्के प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले प्रकल्प आणि विकासकामे यांच्यामुळे होत आहे. याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे […]

maharashtra News

Maratha Reservation : ”ज्यांनी जरांगेंसमोर सर..सर… केलं त्यांनाच अध्यक्ष केलं”, सदावर्तेंचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईः माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीला Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आंतरवाली सराटीमध्ये जावून ज्यांनी मनोज जरांगे यांना सर.. सर… केलं, जे कार्यकर्ता स्वरुप म्हणा किंवा भाईचारा स्वरुप म्हणून जरांगेंकडे गेले, […]

आरोग्य

Walking Pneumonia : थंडीत वाढला वॉकिंग न्युमोनियाचा धोका, कोणाला होऊ शकतो? कशी घ्यावी काळजी ? वाचा सविस्तर

गेल्या काही महिन्यांपासून मायकोप्लाझ्मा म्हणजेच वॉकिंग न्यूमोनियाचे रुग्ण आढळत आहेत. मुंबई : कोरोना महामारीनंतर आता चीनमधून पुन्हा एकदा गंभीर आजाराने तोंड वर काढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मायकोप्लाझ्मा म्हणजेच वॉकिंग न्यूमोनियाचे रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये लहान मुलांना श्वास घेण्यास यामुळे त्रास होतो. चीनमध्ये अशा रुग्णांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. हे टाळण्यासाठी जागतिक आरोग्य […]