क्राइम

Mumbai Crime News : लसूण चोरीच्या संशयावरून बोरिवलीत तरुणाची हत्या, दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. मुंबई : लसूण चोरीच्या संशयावरून बोरिवलीत तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याचा रागातून ४६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. पंकज मंडल असे या मृत तरुणाचे नाव आहे. बोरिवलीच्या एम के भाजीमार्केटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी घनश्याम खाकरोडिया या लसून विक्रेत्याला […]

ताज्या बातम्या

Jalgaon News: चौपदरीकरण मूळ मार्गानेच करावे; खासदार रक्षा खडसेंचे मंत्री गडकरींना साकडे

Jalgaon News: बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच म्हणजे रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी (ता. १४) दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट घेतली. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जोन्नती व चौपदरीकरणासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार खडसे केंद्र व […]

क्रिकेट

MS Dhoni Jersey No 7 : बीसीसीआयचा धोनीच्या जर्सी क्रमांक 7 बाबत मोठा निर्णय; खेळाडूंना दिली सुचना

MS Dhoni Jersey No 7 : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी ही जगभरात प्रसिद्ध आहे. विविध क्षेत्रातील खेळाडूंनी क्रमांक 7 ची जर्सी प्रसिद्ध केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमध्ये देखील या जर्सी क्रमांक 7 च्या भोवती एक दिग्गजत्वाचं वलय निर्माण केलं. आता बीसीसीआयने या जर्सी क्रमांक 7 बद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. धोनीचा जर्सी क्रमांक […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 15 डिसेंबर 2023

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. वृषभ : महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. वाहने जपून चालवावीत. मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कन्या : व्यवसायात वाढ होईल. […]

क्राइम

Solapur Crime News : पोलिसांत तक्रार दिल्याने सहाजणांची एकास मारहाण

पत्नीसह सासूने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून जावयासह सहाजणांनी एकास मारहाण केली Solapur News : पत्नीसह सासूने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून जावयासह सहाजणांनी एकास मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. तसेच त्यांचे मोबाईल फोडून एक तोळा सोन्याची अंगठी चोरुन नेली. सोमवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे नाका परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी त्या सहाजणांविरुद्ध फौजदार चावडी […]

ताज्या बातम्या

Sambhaji Nagar News : महसूलच्या कारभाराची पोलखोल

वैजापूर : स्‍थानिक अधिकाऱ्यांनी केला काणाडोळा वैजापूर : महसूल विभागातील तब्बल दोन लाख १७ हजार शासकीय दप्तर तपासणी करूनही मराठा कुणबी नोंद असल्याचा एकही पुरावा स्थानिक यंत्रणेला आढळला नाही. त्यामुळे येथील महसूल दप्तराची फेर तपासणी हिंगोली येथील उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली सुरु केल्यानंतर फेरतपासणी मोहिमेत मराठा कुणबी नोंदीचे अनेक रेकॉर्ड आता सापडल्याने स्थानिक प्रशासनाचा बेजबाबदार कारभाराची पोलखोल […]

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray: आम्ही याचिकेवर का सुनावणी घ्यायची? उद्धव ठाकरेंविरोधातल्या याचिकेवरून न्यायालयाने सोमैयांनाच फटकारले

Mumbai High Court: सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथे जमीन बळकावल्याचा आरोप करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. केवळ जमीन व्यवहारातील अनियमितता अधोरेखित करण्याच्या उद्देशापुरतीच आम्ही याचिकेवर सुनावणी घ्यायची का, असा सवाल मुख्य […]

maharashtra News

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन फडणवीस यांना टार्गेट करणं दुर्दैवी ! प्रवीण दरेकर यांची खंत, जरांगेंवरही साधला निशाणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणं योग्य नाही, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. Maharashtra Assembly Winter Session: मराठा आरक्षणाचा आंदोलनाकडे राजकीयदृष्ट्या न बघता सर्वच राजकीय पक्षांनी चर्चेच्या माध्यमातून आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. अन्य आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे […]

मनोरंजन

Censor Board New CEO: रविंद्र भाटकरांवरील कारवाईनंतर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष बदलले; स्मिता वत्स यांच्याकडे जबाबदारी

लाचखोरी प्रकरणात रविंद्र भाटकरांची हकालपट्टी झाली असुन नव्या अध्यक्षांकडे जबाबदारी सोपवण्यात आलीय Censor Board New CEO Smita Vats Sharma News: गेल्या काही दिवसांपासुन सेन्सॉर बोर्डाचा वाद चांगलाच गाजतोय. सेन्सॉर बोर्डाचे सीईओ रवींद्र भाटकर यांच्यावर अभिनेता विशालने लाचखोरीचा गंभीर आरोप लावला होता. आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. स्मिता वत्स शर्मा यांची यांची सेन्सॉर बोर्डाच्या नवीन […]

शेयर बाजार

Share Market Opening Bell : शेअर बाजाराची धमाकेदार सुरूवात, सेन्सेक्स 70 हजारांवर उघडला; निफ्टीनेही केला रेकॉर्ड

Share Market All time High : भारतीय शेअर मार्केटची आज (14 डिसेंबर) धमाकेदार सुरूवात झाली आहे. मार्केट सुरू होताना BSE सेन्सेक्स 561.49 अंकांनी वर जाऊन 70,146 अंकावर उघडला. हा आतापर्यंतचा सर्वात उच्च रेकॉर्ड आहे. दुसरीकडे निफ्टीदेखील 184.05 अंकांनी वर जाऊन 21,110.40 अंकांवर उघडला. आज बाजारात सगळीकडे ग्रीन मार्क दिसत आहे. सेन्सेक्स, निफ्टी, बँकनिफ्टी आणि मिडकॅप इंडेक्स […]