नवी दिल्ली : दिल्लीतील इस्राइलच्या दुतावासाबाहेर मंगळवारी झालेल्या स्फोटामुळं खळबळ उडाली होती. यानंतर भारतातील इस्राइली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्राइल नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलनं नवी अॅडव्हाझरी लागू केली आहे. अॅडव्हायझरीत काय म्हटलंय? भारतात राहणाऱ्या इस्राइली नागरिकांसाठी काढण्यात आलेल्या अॅडव्हायझरीत म्हटलं की, इस्राइली नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. यामध्ये मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल-बार आणि मार्केटसारख्या ठिकाणांची न जाण्याचा सल्ला देण्यात आला […]
Author: Sheetal Ugale
Nashik COVID Update : महापालिकेकडून ‘कोविड’ साहित्याची जुळवाजुळव; कोरोना एकही रुग्ण नसल्याचे स्पष्टीकरण
Nashik COVID Update : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नाशिकच्या ग्रामीण भागातही चौथ्या लाटेतील पहिला रुग्ण आढळल्याने शहरी भागात वेगाने प्रसार होण्याच्या शक्यतेने महापालिकेच्या कोरोना सज्जतेचा आढावा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून घेण्यात आला. त्यात नाशिक महापालिकेने उभारलेले दोन ऑक्सिजन प्लॉन्ट महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्सिजन बाबतीत नाशिक महापालिका राज्यात सक्षम असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मागील […]
Pandharpur Accident News : पंढरपुरमध्ये कार अन् ट्रकचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार
पंढरपुरमधील करमाळ्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. करमाळा – नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच […]
Bharat Nyay Yatra: आता ‘भारत न्याय यात्रा’! मणिपूर ते मुंबई सुरु होणार राहुल गांधींचा झंझावात
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर काढलेल्या भारत जोडो यात्रेनंतर आता याची दुसरी आवृत्ती ‘भारत न्याय यात्रा’ जानेवारीत सुरु होणार आहे. ही ६,००० किमी पायी यात्रा असणार आहे. पहिल्या यात्रेचा अनेक राज्यांतून प्रवास झाल्यानं राहुल गांधींना त्याचा चांगला राजकीय फायदाही झाला होता. या यात्रेमुळं कर्नाटकची सत्ता काँग्रेसला मिळाली […]
Devendra Fadnavis : “नावापुढे ‘डॉ’ लागण्यासाठी…”; डॉक्टरेटवरून फडणवीसांवर टीका करणाऱ्या राऊतांना भाजपचं प्रत्युत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टेरेट पदवी देण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकानाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. आजच्या सामना मधील आग्रलेखात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर डॉक्टरेट पदवीचा संदर्भ देत निशाणा साधण्यात आला आहे. या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी […]
Ayodhya Ram Mandir: राज ठाकरेंना खरंच निमंत्रण दिलंय का? राम मंदिराच्या उद्घाटनावरुन ‘राज’कारण तेजीत
पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 27 डिसेंबर 2023
मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. वृषभ : वादविवाद टाळावेत. शासकीय कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. […]
दिव्यांग मायबापाच्या लेकीने पाहिली परदेशात ‘सृष्टी’! पाथर्डी तालुक्यातील सृष्टी साकलाची उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निवड
Pathardi Srushti Sakla: आई -वडील मूकबधीर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. संसाराचा गाडा हाकणारे वडील कापड दुकानात कामाला. या परिस्थितीची जाणीव ठेवत मुलीने सातासमुद्रापार शिक्षणासाठी उड्डाण घेतले. ही प्रेरणादायी संघर्षकहाणी आहे, पाथर्डी तालुक्यातील सृष्टी साकला हिची. घरच्या परिस्थितीची आणि मूकबधीर आईवडीलांच्या कष्टाची जाण ठेवत सृष्टीने धडाडीने अभ्यास केला. आता उच्चशिक्षणासाठी थेट जर्मनीला रवाना झालीय. ही उत्तुंग झेप […]
Nashik News: नववीच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल
तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाशिक : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने शाळेत कबड्डीचे सामने असल्याने घरीच होती. परंतु दुपारी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मीना […]
INDIA: वंचित बहुजनला हवे इंडिया आघाडीचे औपचारिक पत्र; वाचा काय आहे प्रकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी इंडिया आघाडीला बळकट करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे; मात्र आघाडीत सामील होण्यासाठी औपचारिक पत्राची अपेक्षा आहे. समान अजेंडा असलेल्या संभाव्य राजकीय मित्रांनी कागदावर निमंत्रण द्यायला नको काय, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांची […]











