Pune News : ‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा विमा कंपन्यांचेच उखळ पांढरे झाले आहे. आपल्या भागामध्ये शेतकरी ऊस शेती लावतो, कांदा लावतो, डाळिंब लावतो, परंतु सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी उभारीच घेत नाही. परंतु केंद्र व राज्य सरकारांच्या गाजराच्या शेतीला अच्छे दिन आले आहेत,’’ अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे […]
Author: Sheetal Ugale
Camel Smuggling: चोपड्यात 85 उंट पोलिसांच्या ताब्यात; क्रूर, निर्दयी वागणूक देणाऱ्या 4 जणांना अटक
Camel Smuggling : तालुक्यातील शिरपूर – चोपडा रस्त्यावरील गलंगी गावाच्या हद्दीत पुरेसे अन्नपाणी न देता उंटांची अवैधरीत्या क्रूर व निर्दयीतेने गुजरातमधील भूज, कच्छ येथून जाणारा ८५ उंटांचा जत्था अडवून सर्व उंट ताब्यात घेत चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) सकाळी सहाला कारवाई केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या उंटांची गोशाळेत रवानगी करण्यात आली […]
Sanjog Waghere: अजितदादांचा विश्वासूच देणार पार्थ पवारांना आव्हान! ठाकरे गटाकडून लोकसभा लढवण्याची तयारी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण आता अजितदादांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनीच पार्थ पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. यापार्श्वभूमीवर आज वाघेरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर राहिले आहेत. अजित पवारांचे ते […]
Jalna Vande Bharat : वडील एसटीतून निवृत्त अन् मुलगी करणार वंदे भारत ट्रेनचं सारथ्य! मराठवाड्याच्या लेकीची उंच झेप!
आज (30 डिसेंबर) जालना-मुंबई वंदे भारत एक्स्र्प्रेसला हिरवा कंदिल मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेचं उद्घाटन करतील. विशेष म्हणजे या वंदे भारत एक्स्प्रेसचं सारथ्य मराठवाड्याचीच एक लेक करणार आहे. कल्पना धनावत ही तरुणी मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट असणार आहे. हा नक्कीच खूप अभिमानास्पद अनुभव असल्याचं मत कल्पनाने […]
Healthy Snacks : चहासोबत बिस्किट नाही, तर हे पदार्थ खा, लो कॅलरी स्नॅक्सचे भन्नाट ऑप्शन्स!
Healthy Snacks : संध्याकाळी गरम चहा पिण्याचा आनंद वेगळाच असतो. यामुळे दिवसभराचा आळस आणि थकवाही दूर होतो. काही लोकांना चहासोबत काहीतरी खाण्याची सवय असते. बहुतेक लोक चहासोबत स्नॅक्स, बिस्किटे किंवा काही तळलेले पदार्थ खातात. या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वजनही वाढू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ले तर […]
Modi Guarantee: “मोदींची गॅरंटी हा निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर…”; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं
मोदींची गॅरंटी म्हणजे निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर गरिबांना दिलेली वचनपूर्ती आहे, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तरं दिली. गरिबांचा विश्वास ताकद वाढवतो मोदी म्हणाले, गरिबांचा आपल्यावर असलेला विश्वास आपला लढण्याची ताकद देतो. मोदींची गॅरंटी हा निवडणूक जिंकण्याचा […]
आजचे राशिभविष्य – 30 डिसेंबर 2023
मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शासकीय कामे मार्गी लागतील. सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. […]
Asoda Railway Flyover: 2 वर्षांतच आसोदा रेल्वे उड्डाणपूलाचे कामही पूर्णात्वाकडे; ‘महारेल’चे वेगवान कार्य
Asoda Railway Flyover : मध्य रेल्वेअंतर्गत भुसावळ- जळगाव या दोन महत्त्वाच्या जंक्शन स्थानकांदरम्यान आसोदा रेल्वेगेटवर ‘महारेल’कडून उड्डाणपुलाची निर्मिती होत असून या पुलाचे काम हाती घेतल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत पूर्णत्वाकडे आले आहे. आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च पिंप्राळा उड्डाणपुलाच्या पाठोपाठ आता हा आसोदा रेल्वेपूलही लोकार्पणासाठी सज्ज होतोय. आठवडापूर्वी जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटवर उभारण्यात आलेल्या […]
Health Tips : तिशीनंतर तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये करा हे बदल,आयुष्याच्या शेवटपर्यंत रहाल हेल्दी अन् फिट
वयाचा तिशीचा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. या वयात आपण सेटल झालेलो असतो, कामा, नोकरी, संसाराचे एक रूटीन बसलेले असते. जसे या सगळ्या गोष्टींचे रूटीन महत्त्वाचे असते. तसेच, आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचेही रूटीन महत्त्वाचे असते. विशिष्ट वयानंतर महिला आणि पुरुषांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल, त्वचेशी संबंधित समस्या, सांधेदुखी इत्यादी समस्या वाढू लागतात. वयाच्या ३० वर्षानंतर स्वत:ला निरोगी ठेवणं खूप गरजेचं […]
Sangola News : सांगोल्यात पत्रकार पडले पोलिसांवर भारी ; मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलिसांचा पराभव
सांगोला तालुक्यात सध्या हिवाळी विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. नेत्यांचा वाढदिवस असो, शाळेचे स्नेहसंमेलन व इतर कारणांनी सध्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या अशा स्पर्धा मोठ्या उत्साहात घेतल्या जात आहेत. सांगोल्यातील टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या पत्रकार, पोलीस, वकील, समाजसेवक, अधिकारी, राजकारणी यांच्या अनोख्या मैत्रीपूर्ण सामन्याची संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात जोरदार चर्चा रंगली होती. […]











