शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ व्यक्तींचे मुस्लीम संभाषण ऐकल्यानंतर नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे. […]
Author: Sheetal Ugale
साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २०२४)
नोकरी-व्यवसायात भाग्योदय मेष : मकर संक्रमणाचा सप्ताह एकूण आपल्या राशीस शुभलक्षण दाखवेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक भाग्योदयातून निश्चितच बोलेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रव्यथा जाईल. ता. १५ ते १७ हे दिवस मोठी मजेदार फळे देतील. भरणी नक्षत्राची व्यक्ती सुवार्तातून चर्चेत राहील. आदर-सत्कार होईल वृषभ : मकर संक्रमाचा सप्ताह रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून शुभलक्षणी, ता. १६ […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 15 जानेवारी 2024
मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. कन्या : नोकरी, […]
आजचे राशिभविष्य – 14 जानेवारी 2024
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मिथुन : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. […]
Nalasopara Crime:पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी लावला उधळून; वाचा संपूर्ण बातमी
मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील विरार-शिरसाड फाटा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना विरार गुन्हे कक्ष शाखा ३ च्या टीमने नुकतीच अटक केली आहे. यात एका २४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून कोयता, सुरा, बॅटऱ्या, नायलॉनची दोरी, दोन कटावण्या, मिरची पावडर, मोबाईल फोन, दागिने व रोख रक्कम असा १० लाख १६ […]
Radhika Apte: “गेले २ तास आम्हाला…”, एअरपोर्टवर राधिकाला कुणी डांबून ठेवलंय? अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Radhika Apte News: मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिका आपटेचा विशेष भूमिका असलेला मेरी ख्रिसमस सिनेमा रिलीज झालाय. अशातच राधिका आपटेबद्दल एक मोठी बातमी समोर येतेय. राधिका आपटे गेले काही तास एअरपोर्टवर अडकली आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या. राधिकाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ – फोटो शेअर केलेत. त्याखाली राधिकाने कॅप्शनमध्ये लिहीलंय, […]
Mumbai Crime: नालासोपाऱ्याजवळ अवैद्य मद्य वाहतुकीवर कारवाई
Mumbai Crime: उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वसई तालुक्यातील नालासोपारा फाटा भागात नाकाबंदी करून दमण बनावटीच्या विदेशी मद्याच्या बेकायदा वाहतुकीवर कारवाई केली. या वेळी कारमधील ६२ लिटर मद्यसाठा ताब्यात घेण्यात आला. बुधवारी (ता. १०) रात्री केलेल्या कारवाईत चार लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून […]
Amazon Sale Smartphone Offers : अमेझॉनचा ‘रिपब्लिक डे’ सेल झाला सुरू; ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय तगडा डिस्काउंट!
Amazon Great Indian Republic Day Sale : अमेझॉनचा ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेल प्राईम यूजर्ससाठी सुरू झाला आहे. आता आज दुपारी 12 वाजेपासून इतर यूजर्सनाही याचा अॅक्सेस मिळेल. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे. या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड यूजर्सना 10 टक्के अधिक डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन […]
PM Modi Nashik Visit : भगवान आपली वाट बघताहेत; महंत शंकरानंद सरस्वतीचे पंतप्रधान मोदींना त्र्यंबकेश्वरचे निमंत्रण
PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्र्यंबकेश्वर येथील भगवान शंकराच्या दर्शनासाठी यावे, अशी विनंती महंत शंकरानंद सरस्वती यांनी केली आहे. ‘त्र्यंबके भगवान शंकरजी आपकी राह देख रहे है’, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांना आवाहन केले. ‘एक दिन हम जरूर आयेंगे’, असे उत्तर पंतप्रधानांनी आपल्याला दिल्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी सकाळी रामतीर्थावर […]
Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, संगीतविश्वातला तारा निखळला
Prabha Atre Passed Away News: प्रभा अत्रे यांचं दुःखद निधन झालंय. त्या किराणा घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत. आज पुण्यात ९२ व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. शनिवारी पहाटे त्यांचं निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी वाटेतच हृदयविकाराचा […]










