ताज्या बातम्या राजकारण

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त न पाळणाऱ्यांना भाजपात स्थान नको-निष्ठावंतांची मागणी

कोणत्याही परिस्थितीत बंडखोर आणि भाजप पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केलेल्यांना पुन्हा भाजपात घेऊ नये अशी प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी यांची भुमिका आहे.केवळ स्वतःच्या निवडणुकीपुरते पक्षाचे कमळ चिन्ह घ्यायचे,निवडून यायचे,पक्षाला वेठीस धरून लाभांचे पदे उपभोगायचे व नंतर निवडणुकीत बंडखोरी करायची,पक्षाच्या विरोधात जाऊन समोरच्या उमेदवाराला मदत करायची,रसद पुरवायची व समोरचा उमेदवार किंवा स्वतः पराभुत झाले की पुन्हा भाजपात यायचे असा प्रकार यापुढे होणार नाही.उलट पक्षात जे प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे पक्ष संघटनेचे काम करतात,जे पक्षनिष्ठ आहेत अशांनाच आगामी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा आमचा आग्रह राहील.बंडखोर व पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना निवडून यायची खात्री असेल तर त्यांनी भाजपचे कमळ चिन्ह न घेता निवडून यावे. भाजपला ब्लॅक मेल करणारे कशाला पक्षात पाहिजे ? अशा प्रवृत्ती पक्षात नकोच, अशी मागणी सध्या जोर धरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *