नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2024: स्फेरुल फाउंडेशन आणि SMS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR भागीदारीत राबविण्यात आलेल्या कौशल्य आणि उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पाला 2024 च्या इंडियन CSR पुरस्कारांतर्गत “सर्वोत्तम कौशल्य विकास उपक्रम” हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विवांता हॉटेल, नवी दिल्ली येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. स्फेरुल फाउंडेशन तर्फे श्री शांतीसागर कांबळे , प्रोजेक्ट मॅनेजर ,स्फेरुल फाउंडेशन स्वीकारला. या प्रसंगी कन्सेसिया डिसुझा,महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) ,एसएमएस इंडिया ग्रुप प्रा. लि. आणि सुनिल कुमार ,सहायक महाव्यवस्थापक,मोबिलिटी (प्रतिनियुक्ती, व्हिसा, प्रवास व्यवस्थापन), मानव संसाधन,एसएमएस इंडिया ग्रुप प्रा. लि. हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध CSR प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला.




स्फेरुल फाउंडेशनच्या या प्रकल्पामुळे शेकडो महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली असून त्यांचे जीवन अधिक रोजगाराभिमुख आणि सक्षमीकरणाकडे वळले आहे. SMS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे सहकार्य या यशामागे महत्त्वाचे ठरले आहे.
स्फेरुल फाउंडेशनने आपल्या निवेदनात हा पुरस्कार संघटनेसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले असून, सामाजिक परिवर्तनासाठी ते पुढेही कटिबद्ध राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
(स्फेरुल फाउंडेशन आणि SMS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!)