मुंबईः मुंबईतल्या महानंद दूध संघाच्या २७ एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना महानंदच्या पाठिशी खंबीरपणे उभी असून असा प्रकार होऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत पुढे म्हणाले की, एका परझणे नावाच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने महानंदची जमीन घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. इकडे महानंदच्या […]
maharashtra News
daily updates
MSRTC: अखेर एसटी महामंडळाला मिळाला डिझेल टँकर! मात्र, ‘या’ गाड्यांच्या फेऱ्या कराव्या लागल्या रद्द
Truck Driver Strike: ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक सेवेवरही परिणाम झाला होता. संप मिटल्यामुळे बुधवारी दुपारी डिझेल टँकर आगारात पोहोचल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, तत्पूर्वी सकाळी डिझेलअभावी काही गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्यांचे किलोमीटर मध्येच रद्द करावे लागले. मंगळवारी सकाळी गणेशपेठ व घाटरोड आगारात डिझेलसाठा कमी असल्यामुळे सकाळी ८.३० वाजता अमरावती येथे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; आंदोलनाआधी मोठा निर्णय होण्याची शक्यता
मुंबईः मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २० तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतलाय. तीन कोटी मराठे मुंबईत धडक देतील, असं सांगितलं जात आहे. त्यादृष्टीने आता सरकारनेदेखील हालाचली सुरु केलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जावू शकतो, असं बोललं जातंय. महसूल मंत्री […]
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; शिवडी-न्हावाशेवा टोल फक्त २५० रुपये
मुंबईः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला असून शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान टोल ५०० ऐवजी २५० रुपये करण्यात आलेला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने हे बांधकाम झाले आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ५०० रुपयांचा टोल प्रस्तावित केला होता. मात्र नगर विकास विभागाने यात हस्तक्षेप करून तो ३५० रुपयांवर आणला होता. शिवडी ते न्हावाशेवा पूल सुमारे […]
Akole: अकोलेसाठी सतराशे कोटी आणले! आमदार किरण लहामटे यांचे प्रतिपादन
MLA Kiran Lahamate: अकोले तालुक्यात विकासकामांसाठी सतराशे कोटींचा निधी आणला. पिंपरकणे पुलाचे काम झाल्याने डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली. राज्य व देशपातळीवर सर्वांत मोठे डांगी जनावरांचे प्रदर्शन राजूरमध्ये भरते, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. मागील चार वर्षांत कोरोना व लम्पी आजारामुळे प्रदर्शन भरले नाही. यावर्षी चांगले नियोजन केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला धन्यवाद दिले […]
Maharashtra News: अधिकांश राज्य होणार दुष्काळसदृश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यात नवीन निर्माण झालेल्या सर्व मंडळांचा पूर्वीच्या मंडळांनुसार ते दुष्काळसदृश परिस्थितीत येत असतील, तर त्याही गावांचा समावेश दुष्काळसदृश यादीत केला जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंगळवारी (ता. २) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या सर्व गावांच्या याद्या राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडून आठ दिवसांत मागविण्यात आलेल्या आहेत. ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस किंवा ७५० मिलिमीटरपेक्षा कमी […]
Agnihotra Program Nashik : मंत्रांच्या पठनामुळे वातावरण मंगलमय; सदिच्छानगरात सुर्यास्तावेळी सामुहिक अग्निहोत्र
Agnihotra Program Nashik : सदिच्छानगर येथील क्रिकेट मैदानात आज सूर्यास्त वेळी बरोबर ६ वाजून ३ मिनिटांनी अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन शिवपुरी चे सांप्रत अधिकारी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांनी अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं न मम | आणि प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम || या मंत्रोच्चरांच्या साक्षीने सामुहिक अग्निहोत्र केले. फाउंडेशन, अष्टविनायक मित्र मंडळ […]
Solapur News : वाहनचालकांच्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव उद्या (बुधवारी) बंद ठेवले जाणार आहेत. दुसरीकडे भाजीपाल्यांसह फळे, भुसार मालाचीही आवक कमी झाली आहे. ट्रक चालकांच्या संपामुळे बाजार समितीतील अंदाजे १४ कोटींची उलाढाल ठप्प राहील. दुसरीकडे अनेक पंपांवरील पेट्रोलचा साठा संपला असून त्यांचीही कोट्यवधींची उलाढाल बंद आहे. बाजारपेठांमधील भुसार व्यापाऱ्यांचीही ८० ते ९० कोटींची उलाढाल संपामुळे थांबली […]
Hit and Run Law, Truck Drivers Strike : संपामुळं राज्यात 15 लाख ट्रकची चाकं थांबली; तब्बल 500 कोटींचं नुकसान
मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलांना तीव्र विरोध करत राज्यातील ट्रकचालकांचा संप काल (मंगळवार) दुसऱ्या दिवशीही सुरू होता. पेट्रोलटंचाईच्या भीतीने काही ठिकाणी वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. ट्रकचालकांच्या संपामुळे राज्यात ४०० ते ५०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. राज्यात एकूण १५ लाख ट्रकची चाके थांबली आहेत. संपामुळे एका ट्रकमागे प्रतिदिन […]
Nashik Ramesh Bais : राज्यपाल दौऱ्याच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस येत्या शुक्रवारी (ता. ५) नाशिक दौऱ्यावर येत असल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी (ता. १) बैठक घेत शासकीय यंत्रणांना नियोजनाच्या सूचना दिल्या. राज्यपालांचा संदीप विद्यापीठ येथील प्रस्तावित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतला. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, निवासी […]