maharashtra News

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला मोठा दिलासा! कोल्हापूर, सांगली पूरव्यवस्थापनास ‘जागतिक बँके’ची मंजुरी; काय आहे प्रकल्प?

मुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे (Kolhapur, Sangli Flood Management) आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने (World Bank) मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]

maharashtra News

Pune Rain: पुणे शहर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची तारांबळ

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी साताऱ्यासह, पुणे शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसरात आज पहाटेपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं उकाडाही जाणवत होता. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही भागात पावसाला […]

maharashtra News

Nanded News : कारागिरांना मिळणार व्यवसायासाठी तीन लाखापर्यंत कर्ज

Nanded News : विविध १८ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना व्यवसायासाठी प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील व्यावसायिक कामगारांनी ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतंर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी १८ […]

maharashtra News

Nashik News : अंत्यसंस्कारासाठी गोवरीसह सर्व साहित्य मोफत; गोवंश रक्षा समितीचा विधायक उपक्रम

Nashik News : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्याचे काम शहरानजीकच्या निळगव्हाण येथील गोवंश रक्षा समितीची गोशाळा करीत आहे. ‘चारा, पाणी नसेल, तर जनावरे आम्ही सांभाळतो’, या गोशाळेने केलेल्या आवाहनामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. (All materials for cremation free including Gowri from Govansh Raksha Samiti nashik news) यापुढे जात गोवंश रक्षा समितीने अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या गोवऱ्या, कापूर, […]

maharashtra News

Sharad Mohol Murder : पुण्यात गँगवॉर भडकणार? मोहोळवर गोळीबार करताना आरोपीकडून कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी

पुणे : पुण्यात शरद मोहोळ या कुख्यात गुंडाची हत्या झाल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीसांनी तत्काळ कारवाई करत दोन वकिलांसह आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मोहोळ याच्यावर फायरिंग करणारा मुन्ना पोळेकर याने फायरिंग वेळी पुण्यातील एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर […]

maharashtra News

Dhule Fake Doctors : जिल्ह्यात 7 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा; श्रीकांत धिवरेंची कारवाई

Dhule Fake Doctor : वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना जिल्ह्यातील गावागावांमध्ये दवाखाने थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या सात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे. अशा निर्भीड कारवाईमुळे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विनापरवाना दवाखाने थाटून बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या […]

maharashtra News

Nashik News: तब्‍बल 3 कोटी 66 लाखांचा मुद्देमाल मालकांना परत; पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या हस्ते वस्‍तूंचे वाटप

नाशिक : शहर परिसरात घडलेल्‍या मालमत्तेविषयक गुन्‍हे उघडकीस आणत चोरट्यांकडून पोलिस विभागाने मुद्देमाल हस्‍तगत केला होता. या वस्‍तूंचे वाटप शुक्रवारी (ता.५) पोलिस आयुक्‍तालयात झालेल्‍या कार्यक्रमात पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या हस्‍ते मुळ मालकांना केले. तब्‍बल ६ कोटी ६६ लाख ७० हजार ६९७ रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल यावेळी परत केला.  गेल्‍या वर्षभरात दाखल मालमत्तेविषयक गुन्‍हे उघडकीस आणताना […]

maharashtra News

Natya Sammelan : नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी

Pimpri News : ढोल ताशांचा नाद, लेझीमचा ठेका, गुलाबी फेटे घातलेले मान्यवर , रांगोळ्यांच्या पायघड्या अन् कलाकारांची उपस्थिती अशा वातावरणात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी पार पडली. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी -चिंचवड करांनी रस्त्याच्या […]

maharashtra News

Dhule News : महसूल, गौणखनिजची शंभर टक्के वसुली करा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

 शिंदखेडा तहसील विभागात महसूल व गौणखनिज वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दिलेला वसुलीचा इष्टांक शंभर टक्के पूर्ण करून वसुलीच्या इष्टांक पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. कुणीही कामात कुचराई करू नये, असे शुक्रवारी (ता. ५) सकाळी आकराच्या सुमारास शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.  शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकरी गोयल […]

maharashtra News

Nashik News: निधी न मिळण्यास प्रशासकीय राजवटीचा फटका! जिल्ह्यात ZP, पंचायत समितीस्तरावरील दुर्लक्षाचा परिणाम

नाशिक : केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर निधी खर्चाला प्रशासकीय राजवट कारणीभूत ठरली आहे. २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर प्राप्त झालेला निधी खर्च करण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर पुढील हप्ते प्राप्त झालेले नाहीत. पंचायत समितीस्तरावर आतापर्यंत ७६ […]