देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) नाशिक शहरातील पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली. श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतांना ते नतमस्तक झाले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती देखील करण्यात आली. यानंतर मोदींची जाहीर सभेत देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम […]
maharashtra News
daily updates
Nanded : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला तडे ; कामाची गती वाढविण्याची जवळगावकरांची मंत्री गडकरींकडे मागणी
हदगाव : मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाचे होणारे रस्ते संत गतीने सुरू असून नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. हे रस्ते दर्जेदार व जलद गतीने व्हावे अशी मागणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे. मागील अनेक वर्षापासून वारंगा […]
Atal Setu: समुद्रात 17 KM 6 लेन हायवे, 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत..जाणून घ्या मुंबईत बांधलेल्या अटल सेतूबद्दलच्या 10 खास गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 12.15 वाजता ते नाशिकला पोहोचतील, तेथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील. दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान मुंबईत ‘अटल बिहारी वाजपेयी सेवारी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन करतील. दुपारी 4:15 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. अटल बिहारी वाजपेयी […]
PM Modi Nashik Visit : राजकीय क्षेत्रातून मोदींच्या उमेदवारीचे स्वागत; विकासाची गती वाढणार असल्याचा विश्वास
PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक नाशिकमधून लढविण्याबाबतच्या प्रस्तावाला विविधस्तरांवरुन सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणे राजकीय क्षेत्रातूनही मोदींच्या उमेदवारीच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. त्यांनी येथून नेतृत्व केल्यास नाशिकच्या विकासाची गती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यानिमित्त व्यक्त केला आहे. राजकीय पक्षाची भूमिकेपासून तर अन्य विविध बाबींमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये क्वचितच […]
‘लोकसभेसाठी सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, बेंटेक्स उमेदवार नको’; महाविकास आघाडीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून सामोरे जायचे आहे, मात्र सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी द्या. ‘बेंटेक्स’ उमेदवार नको, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. सतेज पाटील यांनी प्रास्ताविक […]
Ayushman Health Card : मंदिरातच मिळणार ‘आयुष्मान हेल्थ कार्ड’; नाशिकच्या काळाराम मंदिरापासून प्रारंभ
Ayushman Health Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यातून ‘आयुष्मान हेल्थ कार्ड’चा नवा पॅटर्न भारतवासीयांना मिळणार आहे. त्याचा प्रारंभ नाशिकच्या काळाराम मंदिरापासून होत असून, धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून त्याचा प्रसार होणार असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. ‘आयुष्मान हेल्थ कार्ड’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. जनतेला या योजनेत सहभागी […]
धाकधूक वाढली! उद्धव ठाकरेंचं झालं, आता पवारांचा नंबर; 31 जानेवारीला राष्ट्रवादीचा निर्णय घेणार विधानसभा अध्यक्ष
NCP MLA Disqualification Case: महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (बुधवार) शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिका निकाली काढल्या. शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी ह्या याचिका दाखल केल्या होत्या. दरम्यान हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नार्वेकर यांना […]
Shivsena MLA Disqualification Timeline: सूरत ते मुंबई व्हाया गुवाहाटी ! सत्तासंघर्षाच्या दीड वर्षात नेमकं काय घडलं ?
दीड वर्षापासूनचा सत्तासंघर्षातील आमदार आपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. तर शिंदे गटाने देखील उद्धव ठाकरे यांच्या १४ आमदरांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान शिवसेनेत बंड झाला तेव्हापासून आतापर्यंत काय […]
Anti Defection Law : “भारतात पक्षांतरबंदी कायदा..” सेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत कायदेतज्ञांच मत काय ?
Pune News : ‘‘भारतात पक्षांतर विरोधी कायदा मजबूत करण्याची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘‘शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही मुद्दे मला पटलेले नाहीत. विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या प्रकरणाचा निर्णय जर कोणाच्याही विरोधात गेला तर सर्वोच्च न्यायालयात जाता येते. पण न्यायालयही लवकर निर्णय देणार नाही. त्याला दोन महिने […]
Post Office: भारतीय डाक विभागात; स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु!
भारतीय डाक विभागाने आपली स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु केली आहे. या स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल कायर्यालयाच्या परिसरातून ग्राहक कधीही पार्सल आणि पत्रे गोळा करू शकतात. या स्मार्ट आणि डिजिटल प्रणालीमुळे ग्राहकांच्या पार्सल सेवेत सुलभता येणार आहे. स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकर ही उच्च-तंत्र सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली कोणत्याही खर्चाशिवाय […]