ताज्या बातम्या

Akola MIDC: एमआयडीसीतील रस्ते विकासासाठी ५२ कोटी, वाहतूकनगर मधील टर्मिनलचे बांधकामही होणार; लवकरच सुरू होणार काम

Akola MIDC Development Work: औद्योगिक वसाहतीतील अकोला विकास केंद्र, वाहतूक नगर मधील टर्मिनलचे बांधकाम तसेच फेज १, २ व ३ मधील रस्त्यांच्या डांबरी करणाचे कामांसाठी ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ही विकास कामे लवकर सुरू होणार असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. अकोला येथील औद्योगिक विकास वसाहतीतील विकास कामे करण्याकरिता अकोला विकास केंद्र […]

ताज्या बातम्या

Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

Ram Temple Ayodhya Security:  22 जानेवारीला होणारा अभिषेक सोहळा होणार आहे. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन लक्षात घेऊन उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झाले आहे. चौका-चौकात कमांडो तैनात करण्यात आले आहेत. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) कमांडो तैनात करण्यात आले आहेत.   सुरक्षेत कुठलीही कुचराई […]

ताज्या बातम्या

देशातील 77 टक्के लोक शेण खातात, असं तुमचं म्हणणं आहे का? आव्हाडांचा फडणवीसांना सवाल

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांच्या मांसाहाराच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आव्हाड शेणही खात असतील असं ते म्हणाले होते. यावरुन आव्हाडांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.(Are you saying that 77 percent of people in the country eat […]

ताज्या बातम्या

Sachin Tendulkar News : सचिन तेंडुलकर डीपफेक प्रकरणात नवा ट्विस्ट! महाराष्ट्र सरकारने घेतली मोठी ॲक्शन

Sachin Tendulkar Deepfake Video Controversy : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सोमवारी त्याच्या X अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर चांगलाच संतापलेला दिसत आहे. वास्तविक, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा राग त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ गेमिंग अॅपद्वारे वापरण्यात आल्यानंतर दिसून आला. गेमिंग अॅपद्वारे सचिनचा व्हिडिओ खोटी जाहिरात म्हणून वापरण्यात […]

ताज्या बातम्या

Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, संगीतविश्वातला तारा निखळला

Prabha Atre Passed Away News: प्रभा अत्रे यांचं दुःखद निधन झालंय. त्या किराणा घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत. आज पुण्यात ९२ व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. शनिवारी पहाटे त्यांचं निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी वाटेतच हृदयविकाराचा […]

ताज्या बातम्या

Atal Setu Inauguration : ठाकरे गटाच्या नेत्यांना सावत्रपणाची वागणूक? ऐनवेळी मिळालं अटल सेतू उद्घाटनाचं निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान या उद्घाटनावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार-खासदारांना ऐनवेळी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.  निमंत्रण पत्रिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांची नावे नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. […]

ताज्या बातम्या

Republic Day: प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘शिवराज्याभिषेक दिन’;  चित्ररथातून महाराजांना मुजरा

नागपूर: प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘शिवराज्याभिषेक दिन’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. आंध्रप्रदेशच्या सीमेवर वैदर्भीय कलावंत हा चित्ररथ साकारत असून त्याची पहिली झलक २३ जानेवारी रोजी कर्तव्यपथावर होणाऱ्या तालमीमध्ये पाहायला मिळेल. नागपूरच्या शुभ ॲड्स कंपनीला राज्याचा चित्ररथ साकारण्याचे कंत्राट मिळाला असून यवतमाळ व वर्धा येथील ३० कलावंतांचा समूह दिवसरात्र मेहनत घेत हे चित्ररथ साकारत […]

ताज्या बातम्या

PM Modi : मालदीवला मोठा झटका! EaseMyTrip ने सस्पेंड केल्या सर्व फ्लाइट्स बुकिंग; PM मोदींवरील टिप्पणी चांगलीच भोवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मालदीववरील भारताचा संताप कमी होण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणी सोशल मीडियावर युजर्स खूपच भडकल्याचे पाहायला मिळाले होते, यानंतर आता बड्या ट्रॅव्हल कंपन्यांनी देखील या प्रकरणात बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. ईज माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने मालदीवला मोठा झटका दिला आहे. देशातील सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी ईज […]

ताज्या बातम्या

…तरी अजित दादा गप्प का?; ‘बारामती अ‍ॅग्रो’वरील कारवाईनंतर रोहित पवारांची पत्रकार परिषद

मुंबई– सक्तवसुली संचालनालयाने रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर छापे टाकले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ईडी, सीबीआयला आम्ही सहकार्य केलं आहे. पण, काहीजण सुडाचं राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हातोडा घेऊन गेलेल्यांचा काय झालं, असे अनेक प्रश्न करत रोहित पवार यांनी […]

ताज्या बातम्या

Ram Mandir: अयोध्येतील प्रमुख चौकाला बाळासाहेबांचे नाव द्या; मनसेचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई– मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. अयोध्येतील प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. राम मंदिराच्या सुरुवातीच्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सक्रिय भूमिका होती. याच प्रकरणी अयोध्येतील मुख्य चौकाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा असं नारकर पत्रात म्हणाले आहेत. […]