ताज्या बातम्या

Tata Group: टाटांचा एअरबस सोबत करार! संयुक्तपणे बनवणार H125 हेलिकॉप्टर; गुजरातमध्ये होणार उत्पादन

Tata-Airbus Deal: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी टाटा समूहाने विमान निर्मिती कंपनी एअरबससोबत करार केला आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतातील उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. टाटा ग्रुपने व्यावसायिक वापरासाठी एअरबस H125 सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची संयुक्तपणे […]

ताज्या बातम्या

Krutrim: भारताला मिळाला पहिला एआय युनिकॉर्न; ‘कृत्रिम एआय’ने उभारला 50 दशलक्ष डॉलरचा निधी

AI startup Krutrim becomes India’s first unicorn: एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत भारताला पहिला एआय युनिकॉर्न मिळाला आहे. Ola च्या नवीन AI स्टार्टअप ‘कृत्रिम AI’ ला 50 दशलक्ष डॉलर (सुमारे 415 कोटी रुपये) निधी मिळाला आहे. यासोबतच याला देशातील पहिल्या एआय युनिकॉर्नचा दर्जाही मिळाला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, उभारलेल्या निधीमुळे AI लँडस्केपमध्ये क्रांती घडवून […]

ताज्या बातम्या

Manoj Jarange : GR मिळाला पण गुलालाचा अपमान करु नका.. आंदोलन मागे घेतल्यावर जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी

मुंबई– मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवा जीआर स्वीकारला आहे. सभेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, माझा तमाम मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय. आपण याठिकाणी आलो होतो तो हेतू साध्य झाला आहे. ५४ लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात […]

ताज्या बातम्या

Nitish Kumar: नितीश कुमारांचं ठरलं; भाजपसोबत जात रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ?

पाटणा– बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी म्हणजे २८ तारखेला भाजपसोबत पदाची शपथ घेऊ शकतात. नितीश कुमार भाजपसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. […]

ताज्या बातम्या

Shahjahanpur Road Accident: गंगेत स्नान करण्यासाठी जाताना काळाचा घाला; ट्रकच्या भीषण धडकेत १२ भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अल्हगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर भरधाव ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली. या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहाजहानपूरच्या मदनापूर पोलीस ठाण्याच्या दामगडा गावातून गंगेत स्नान करण्यासाठी धाई घाटावर जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ऑटोला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर […]

ताज्या बातम्या

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूला असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सची बाजूच्या कंटेनरला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चालकाला […]

ताज्या बातम्या

Budget 2024: केंद्र सरकार अन्न अनुदानासाठी 2.2 ट्रिलियन तरतूद करण्याची शक्यता; कोणाला होणार फायदा?

Budget 2024: केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकार अन्न अनुदानासाठी सुमारे 2.2 ट्रिलियनची तरतूद करण्याची शक्यता आहे. ही तरतूद चालू आर्थिक वर्षाच्या खर्चापेक्षा 10% जास्त आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 2023-24 साठी अनुदान वाटप 1.97 ट्रिलियन […]

ताज्या बातम्या

Gyanvapi Row: ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाचा निर्णय, दोन्ही पक्षकारांना ASI अहवाल सादर करण्याचे आदेश

Gyanvapi Row: ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही बाजूंना उपलब्ध करून द्यावा, असा आदेश कोर्टाने दिला आहे. सर्वेक्षणाचा अभ्यास अहवाल सार्वजनिक करू नये, असा अर्ज मुस्लिम पक्षाने दिला होता. १८ डिसेंबर रोजी एएसआयने अभ्यास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. सर्वेक्षणाचा पाहणीचा अभ्यास अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर केला होता. एएसआयने चार […]

ताज्या बातम्या

Air India: ज्या प्रवाशाला मिळाली खराब सीट, ते निघाले निवृत्त न्यायमूर्ती.. आता एअर इंडियाला द्यावी लागणार 23 लाखांची भरपाई!

निवृत्त न्यायमूर्ती राजेश चंद्र यांना विमान प्रवासादरम्यान खराब सीट दिल्याबद्दल राज्य ग्राहक आयोगाने एअर इंडियाला मोठा दंड ठोठावण्यात आलं आहे. राज्य ग्राहक आयोगाने एअर इंडियाला 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्तींना ४५ दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे. 14 जून 2022 रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राजेश चंद्रा आणि […]

ताज्या बातम्या

Pm Modi – Aarya Ambekar: मोदींनी घेतली मराठी कलाकारांच्या गाण्याची दखल, आर्या आंबेकर म्हणाली, “श्रीरामाचा आशीर्वाद जणू..”

Pm Modi – Aarya Ambekar News: सध्या संपूर्ण भारतात नागरिकांना अयोध्या राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता आहे. २२ तारखेला अयोध्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. अनेक गायक – संगीतकार या सोहळ्यानिमित्ताने श्रीरामाला समर्पित गाणं लोकांच्या भेटीला आणत आहेत. अशातच पंतप्रधान मोदींनी मराठी कलाकारांनी गायलेल्या हृदय में श्रीराम या गाण्याची दखल घेतली आहे. काय म्हणाले मोदी? पंतप्रधान मोदींनी […]