मुंबई, दि. ८ – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कृषिमंत्री यांच्या सोयाबीन पाठपुराव्याला यश केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत […]
ताज्या बातम्या
‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना
मुंबई, दि. ७ : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे” अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. […]
‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच […]
श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन –
मुंबई, दि. ६: श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेशांचे […]
शिवसेना उपनेते,ना. मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना सरपंच संघटने तर्फे निवेदन
१५ लाखा पर्यनत ची कामे ग्रामपचायतीला घेता येणार नाही ह्या बाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून योग्य तो न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय सरपंच यांच्या हक्कासाठी, आज महाड तालूक्याचे कार्यसम्राट आमदार, पक्ष प्रतोद शिवसेना विधीमंडळ, शिवसेना उपनेते, ना. मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना त्यांचे महाड येथील […]
महादेव गंगाधर सोन्नर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT विभागाच्या प्रदेशमहासचिव पदी निवड
महादेव गंगाधर सोन्नर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT विभागाच्या प्रदेशमहासचिव पदी निवड करण्यात आली व ही निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रांतध्यक्ष आदरणीय मा नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.पल्लवीताई रेणके यांनी केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. ही निवड म्हणजे […]
Akola: संतापजनक! शासकीय रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना हीन वागणूक, ८० वर्षीय आजीला स्ट्रेचरखाली ठेवलं अन्..
Akola Government Hospital: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात सोमवार, ता. २९ जानेवारी अतिशय निंदनीय प्रकार घडला. एका ८० वर्षांच्या आजीला स्ट्रेचरवरून खाली टाकून दोन महिला कर्मचाऱ्यांनी पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली व वृद्ध रुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जाताना कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सर्वोपचार रुग्णालयात जेथे सकाळच्या सत्रात ओपीडी होते, तेथे पायऱ्यांच्या खाली […]
Modi Govt 2.0: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात आरोग्य, शिक्षणावर कमी खर्च; अशी आहे आकडेवारी
नवी दिल्ली : येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय बजेट सादर होणार आहे, हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचं आणि अंतरिम बजेट असणार आहे. पण गेल्या पाच वर्षातील बजेटचा धांडोळा घेतला तर त्यात आरोग्य, शिक्षणावर कमी खर्च झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर इतरही विविध क्षेत्रांमध्ये किती खर्च झालाय याची आकडेवारी देखील समोर आली आहे. बिझनेस स्टँडर्डनं याबाबत वृत्त […]
विश्व देवरहाटीचे
धुक्याची चादर अलगद बाजूला सरकावून येणाऱ्या उबदार किरणांचा शिडकावा. धनेश, पोपट, कोतवाल, शिळकस्तूर आणि इतर पाखरांच्या कानावर पडणाऱ्या गुजगोष्टी. वाऱ्याची आणि पानांची अलगद होणारी सळसळ. देवळातील मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दिसणारी तेजप्रभावळ आणि मनाला भावुक करणारी शांतता. कोकणात गावोगावी गाव देवळाच्या सानिध्यात किंवा जंगलाच्या आजूबाजूला वसलेल्या अशा रहाटी वर्षानुवर्षे डामडौलात उभ्या आहेत. कोणत्याही कायद्याने संरक्षण नसतानासुद्धा […]
संजय राऊत-रोहित पवारांनी उभा केलेला स्टंट.. मराठा आरक्षणाच्या विजयावर सदावर्तेंची टीका
मुंबई– सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भात शिंदे सरकारडून अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. यावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या अध्यादेशाविरोधात लवकरत कोर्टात जाणार आहोत, अशी भूमिका सदावर्ते यांनी स्पष्ट केली. माझे मराठे बांधव आता ईडब्यूएसपासून वंचित राहतील. त्यांना EWS पासून दूर ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. सरकारचा अध्यादेश एक […]