शेयर बाजार

Azad Engineering: आझाद इंजिनीअरिंगच्या IPOची धमाकेदार एट्री, शेअर्स 37.50 टक्के प्रीमियमवर लिस्ट

Azad Engineering IPO: सचिन तेंडुलकरने गुंतवणूक केलेली कंपनी आझाद इंजिनिअरिंगने गुरुवारी शेअर बाजारात चांगली सुरुवात केली. कंपनीचा शेअर बीएसईवर 35.50 टक्के प्रीमियमवर 710 रुपयांवर लिस्ट झाला. हा शेअर NSE वर 37.40 टक्के प्रीमियमवर 720 रुपयांवर लिस्ट झाला . तर इश्यूची किंमत 524 रुपये होती. गुंतवणूकदारांकडून शेअरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

आझाद इंजिनिअरिंगचा IPO 20 डिसेंबर रोजी उघडण्यात आला आणि 22 डिसेंबरपर्यंत बोलीसाठी खुला राहिला. कंपनीने IPO मध्ये 499 ते 524 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला होता. कंपनीच्या IPO च्या एका लॉटमध्ये 28 शेअर्स होते.

अशाप्रकारे, IPO मध्ये बोली लावण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान 14,672 रुपयांची आवश्यकता होती. आता लिस्ट केल्यानंतर एका लॉटची किंमत 20,160 रुपये झाली आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी IPO गुंतवणूकदारांनी प्रत्येक लॉटवर 5,488 रुपयांचा नफा कमावला आहे.

सचिनकडे कंपनीचे ‘इतके’ शेअर्स

आझाद इंजिनिअरिंगच्या आयपीओचा एकूण आकार 740 कोटी रुपये होता. यामध्ये 240 कोटी रुपयांचे शेअर्सचे इश्यू आणि 500 ​​कोटी रुपयांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरनेही कंपनीत पैसे गुंतवले आहेत. सचिनने मार्च 2023 मध्ये कंपनीत सुमारे 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी कंपनीचे 14,607 शेअर्स 3,423 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले होते. स्प्लिट आणि बोनसनंतर आता त्यांच्याकडे कंपनीचे 3,65,175 शेअर्स आहेत.

आझाद इंजिनिअरिंग जुनी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1983 मध्ये झाली. कंपनी एरोस्पेस आणि टर्बाइन बनवते. कंपनीच्या IPO ला बाजारात प्रचंड प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या ग्राहकांमध्ये जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल इंटरनॅशनल इंक., मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, सीमेन्स एनर्जी, ईटन एअरोस्पेस आणि मॅन एनर्जी सोल्युशन्स एसई यांचा समावेश आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *